सैफन शेख म्हणाले मी पुन्हा आलोय...मी पुन्हा आलोय
सोलापूर : दि.०१ (सैफन शेख) एमडी२४न्यूज म्हणजेच महाराष्ट्र दर्पण २४ न्यूजचे पत्रकार व संपादक सैफन शेख यांची तडीपार अखेर रद्द ठरवण्यात आली आहे. सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैफन शेख आहे. खऱ्या बातम्या प्रकाशित करत एखादा विषय लावून धरला आणि मारहाण ते खोटा गुन्हा असा प्रवास सैफन शेख यांचा होता. दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातुन तडीपार यामुळे खरी पत्रकारिता करणाऱ्यांसाठी मोठा धक्का बसला होता. काही चाटूकारिता करणाऱ्यानी खबऱ्याचे काम करून सैफन शेख यांचा गेम केला होता. या सर्वांना दोन हात करत,तीनच महिन्यांत तडीपार रद्द करून,कायदेशीररित्या सैफन शेख सोलापुरात परतले आहेत. धडाडीचे पत्रकार सैफन शेख सोलापुरात दाखल होताच पत्रकार संघटनेच्या कृती समितीने मोठ्या उत्साहाने त्यांचा स्वागत केला. तडीपार रद्द करणाऱ्या विभागीय आयुक्तांचा आभार व्यक्त केला.
चाटुकारीता करत पत्रकारांचा गेम करणाऱ्याना एक मोठी चपराक बसली आहे. तीन महिन्याचा खडतर प्रवास आणि पुणे,मुंबई,आणि नागपूर येथे पत्रकारितेचे अनुभव घेऊन आलेल्या सैफन शेख यांचा पत्रकार कृती समितीने जाहीर सत्कार केला. सैफन शेख यांनी सत्कारावेळी तीन महिन्यांचा अनुभव व्यक्त केला. तडीपार झाल्याने कोण आपलं आहे,आणि कोण परक आहे,याची जाणीव झाल्याची माहिती दिली. कशा पद्धतीने पत्रकारांचा वापर केला जातो,पत्रकारांच्या नावावर जोगवा कोण मागत फिरत आहेत या सर्व बाबींवर प्रकाश टाकला. भविष्यात चाटुकारीता करणाऱ्याचा पर्दाफाश करणार असा इशारा सैफन शेख यांनी दिला. चाटुकारांच्या नाकावर टिच्चून कायदेशीर लढाई लढत तडीपार आदेश रद्द करत पुन्हा आलोय असं सैफन शेख यांनी सांगितलं.
तीन महिन्यांत बरेच काही शिकायला मिळाले,बरेच गोड आणि कडू अनुभव आल्याची माहिती सैफन शेख यांनी दिली.तडीपार झाल्याने बाहेर गावातील पत्रकारिता करण्याचा योग आला. नागपूर अधिवेशन कसे कव्हर करायचे,मुंबईत जाऊन मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्याच्या बातम्या कशा लिहायच्या याचं उत्तम अनुभव आल्याची प्रतिक्रिया सैफन शेख यांनी दिली. पत्रकारांनी डबक्यात बसून उड्या मारण्याऐवजी बाहेरच जग पाहावे,अन् पत्रकारिता करावी. चांगल्या योग्य आणि खऱ्या बातम्या करण्याचा अनुभव मिळेल असा मोलाचा सल्ला दिला. बाहेरच्या जगात मोठं मोठे चाटुकार चाटुकारीता करताना सापडतील. हे चाटुकारीता करणारे,झोळी घेऊन भिक्षा मागताना आढळतील. माझ्या वाईट काळात ज्यांनी मला मदत केली,मला सल्ला दिला ॲड.तृणाल टोणपे,ॲड.कादीर औटी,ॲड.गौणजी मोरे,दीनानाथ काटकर,मनीष देशपांडे, जेष्ठ पत्रकार इक्बाल शेख,माजी पो.नि.मेहबूब मुजावर यांच्यासह सोलापूर कृती समितीच्या मनापासून आभार,आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील असे सैफन शेख यांनी बोलताना आपल्या मनोगतात व्यथा मांडल्या.
पत्रकार कृती समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेसमोर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहिम पठाण, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे,कार्याध्यक्ष डि.डि.पांढरे,सचिव लतिफ नदाफ,खजिनदार रजाक मुजावर,सह खजिनदार युनूस अत्तार,शब्बिर मनियार,मुसा अत्तार,कलिम पटेल,रफिक देगनाळकर,इरफान मंगलगिरी,शबरोज शेख गौस शेख,बबलू चंडर्की, अनिल साखरे,एजाज नदाफ,साकिब शेख यासीन शेख,सादिक नदाफ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व सहकारी मित्र उपस्थित होते.
