Ticker

6/recent/ticker-posts

आधुनिक भारतातील पहिली महिला डाॅक्टर...

आधुनिक भारतातील पहिली महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी नसून माळी जातीतील डाॅ.रखमाबाई राऊत या आहेत...

सस्नेह जय ज्योती जय क्रांती !!

 
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची 160 वी जयंती.  त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी,तर मृत्यु 25 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे आजोबा ह्यांना ब्रिटीश सरकार कडून " जस्टीस ऑफ पिस" हे सन्मान पत्र मिळाले. कारण ते त्या काळात सत्यशोधक पध्दतीने विवाह लावून देत असत. रखमाबाई 15 वर्षोंच्या असतांना त्यांच्या वडलांचा मृत्यु झाला.

रखमाबाईंचा विवाह - डॉ.सखाराम शाहू ह्यांच्याशी झाला. ते जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे असीस्टंट म्हणून कार्यरत होते. त्यांनी रखमाबाईस शिकवले व 1889 ला एमडी साठी इंग्लडला पाठवले. त्या 1894 साली " लंडन स्कूल ऑफ मेडिकल" ची परीक्षा पास झाल्या. त्यांनी महिलांसाठी "वनीता" समाजाची निर्मिती केली. रेडक्रॉस ची गुजरातला शाखा उघडली. 1894 ला मुंबईच्या काया हॉस्पीटल मध्ये त्यांची नियुक्ती झाली.

गुजरात मध्ये जेंव्हा प्लेगच्या साथीचा कहर झाला तेंव्हा मालवी हॉस्पीटल मध्ये रुजू झाल्या. पहील्या महायुद्धात जखमी झालेल्या सैनीकांची त्यांनी सेवा केली. त्यामूळे ब्रिटीश सरकारने त्यांना " कैसर-ए-हिंद " पुरस्कार दिला.
रेडक्रॉसने ही त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित केले.
अशी ही पडद्यामागची महानायिका लोकांसमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न,बहुजन समाजाच्या असल्याने त्या प्रकाश झोतात येऊ शकल्या नाहीत. त्यांना माझे  त्रिवार नमन !! 🙏🏼