सोलापूर : कोंडी येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मिडियम स्कूल व राजर्षी शाहू महाराज सेमी स्कूल कोंडी येथे आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विजयसिंह मोहिते पाटील कॉलेजचे प्रा.नवनाथ भोसले,प्राचार्य सुषमा नीळ,संस्थेचे संस्थापक गणेश नीळ,मुख्याध्यापक वैभव मसलकर,महादेवी माने आदीउपस्थित होते.
यावेळी प्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर श्रावणी वाघचवरे, सह्याद्री नीळ,संजीवनी राऊत,प्रज्ञा नीळ,सिद्धी घडामोडे, स्वरा शिंगारे,समर्थ अवताडे,योगिता श्रावण,कौशल भोसले या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रा.नवनाथ भोसले यांनी महामानवांचे विचार अंगीकारा हीच त्यांना खरी आदरांजली असेल असे बहुमोल मार्गदर्शन आपल्या मनोगतात केले. याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन शीतल कांबळे यांनी तर आभार अश्विनी नीळ यांनी केले.
