सेटलमेंट येथे पारधी समाजातील कै.रामजी चंद्रकांत काळे,कै.मोहन लाला काळे (पोलीसA.S.I), कै.नंदिनी अनिल चव्हाण यांच्या स्मरणार्थ क्रिकेट सामन्यांचे आयोजन.
सोलापूर शहरातील सेटलमेंट परिसरात भव्य टेनिस क्रिकेट सामने भरवण्याचा आलेले असून त्याचे उद्घाटन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण,सोलापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी धनंजय झाकरडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पार्वतीबाई मुरलीधर काळे यांचे हस्ते करण्यात आले.
प्रथम भारतरत्न,बोधिसत्व,महामानव,कै.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून पूजन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दहा क्रिकेट टीम सदर टूर्नामेंट मध्ये सहभागी झाले असून.
१)प्रथम पारितोषक पोलीस हवालदार कै.रामजी चंद्रकांत काळे यांच्या स्मरणार्थ २०,०००/- रुपयेचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
२)द्वितीय पारितोषक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कै.मोहन लाला काळे यांच्या स्मरणार्थ १०,०००/-रुपयेचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
३)तिसरे बक्षीस कै.नंदिनी अनिल चव्हाण दामले वस्ती मुळेगाव रोड सोलापूर यांच्या स्मरणार्थ ५०००/- रुपयेचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.
उद्घाटनिय सामन्याच्या अगोदर राष्ट्रगीत गाऊन सामना सुरू करण्यात आला त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण,महेश मुरलीधर काळे, मनोज मुरलीधर काळे,मंगला रामजी काळे,सिद्धाराम भीमराव चव्हाण,सुरज सिद्राम चव्हाण, संदीप रमेश काळे,गोपाल अर्जुन काळे, किसान विठ्ठल चव्हाण, सुरेंद्र दत्ता काळे, सोमनाथ दत्ता काळे, दत्ता विठ्ठल चव्हाण, विशाल चव्हाण, विनायक काळे (एक्साईज पोलीस),उमेश दीपक काळे, कुणाल दिलीप काळे,गजानन सिद्राम चव्हाण,श्रीकांत किरण चव्हाण,श्रीकांत सुरेश चव्हाण (पुजारी), यशवंत दगडू काळे कुंभारी,आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहून सदर कार्यक्रमची शोभा वाढीवली.
