Ticker

6/recent/ticker-posts

शाळेच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

राष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

सोलापूर : कोंडी येथील विजयसिंह मोहिते पाटील जुनियर कॉलेज कोंडी या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या  तलवारबाजी खेळातील राष्ट्रीय विद्यार्थिनी श्रावणी शिंदे व शूटिंग बॉल खेळातील राज्यस्तरीय विद्यार्थिनी कस्मला नालबंद यांच्या हस्ते जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मिडियम स्कूल व राजर्षी शाहू महाराज सेमी इंग्लिश स्कूल कोंडी येथे आज वार्षिक क्रीडा सप्ताहानिमित्त क्रिडांगनाचे पूजन करून स्पर्धेचे उद्‌घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
     
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त   ताइक्वांदो प्रशिक्षक  व  राष्ट्रीय ताइक्वांदो पंच नेताजी पवार तसेच बी. कयू. के गर्ल्स हायस्कूल च्या क्रिडा प्रशिक्षक अनिसा नालबंद उपस्थित होत्या. संस्थेचे संस्थापक गणेश नीळ,प्राचार्या सुषमा नीळ,क्रीडा प्रमुख दिलीप भोसले, मुख्याध्यापक वैभव मसलकर,अर्चना औरदे उपस्थित होते. याक्रीडा सप्ताहात कबड्डी,खो-खो,गोळा फेक थाळी फेक, बादलीत बॉल टाकणे,लांब उडी,धावणे,लिंबू चमचा,संगीत खुर्ची, पोत्यातील उड्या,क्रिकेट या खेळांचा रंगतदार खेळ या सप्ताहात चालणार आहे.

यावेळी अनिसा नालबंद यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल सोडून मैदानावर मनसोक्त खेळा असा सल्ला दिला. तर नेताजी पवार यांनी मुलांना मैदानावरील खेळाचे महत्व पटवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध मैदानावर सराव करून प्रावीण्य कसे मिळवावे याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश नीळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून मन,मनगट,शरीर मजबूत ठेवण्यात खेळ किती महत्वाचा याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
     
याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना औरादे यांनी तर आभार क्रीडाशिक्षक दिलीप भोसले यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.