Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ.बाबासाहेब एक व्यक्ती नाही,ते एक संस्था !

भारतीय संविधानाचा मार्गच देशाला महाशक्ती करु शकतो...

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी,दादर येथे आज महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णनजी,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी डॉ.नरेंद्र जाधव लिखित 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे अनावरण करत मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायासोबत संवाद साधला.

आपला देश आज जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय, त्याचे श्रेय भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे आहे. जगाच्या पाठीवरील सर्वात सुंदर संविधान भारताचे आहे. हे संविधान सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मूलमंत्र देते. देशासमोरील कोणत्याही समस्येचा उपाय भारताच्या संविधानामध्ये आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांचा सगळ्या विषयात अभ्यास,व्यासंग होता आणि त्यांची ती दृष्टी आपल्याला संविधानात आलेली पाहायला मिळते. देशाचे कायदेमंत्री,मजूर मंत्री,पाटबंधारे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कार्यकाळात पायाभूत गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली, संविधान अंमलात आणण्याचे व्हिजन त्यांच्यामध्ये होते.

बाबासाहेब एक व्यक्ती नाही,एक संस्था आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग भारतीय संविधानाचा आहे आणि तोच आपल्या देशाला महाशक्ती करु शकतो. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा आपल्यासाठी भारताचे संविधानच महत्त्वाचे आहे. आपले सरकार जे काम करेल ते संविधानाला अनुसरुनच असेल,वंचितांचाच विचार आमच्या मनात असेल. इंदूमिल स्मारकाचे कामही वेगाने पूर्ण करणार,अशी ग्वाही यावेळी दिली.

यावेळी आ.मंगलप्रभात लोढाजी,आ.कालिदास कोळंबकरजी,आ.प्रवीण दरेकर,आ.दीपक केसरकर,आ. राजकुमार बडोले,आ.संजय बनसोडे व इतर मान्यवर उपस्थित होते.