Ticker

6/recent/ticker-posts

पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन

           
सोलापूर : दि.०२ (एमडी२४न्यूज)  जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी,व सुशिक्षित बेरोजगारांसाठी,जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे १५ दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, इच्छुकांनी दि. ०७ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  डॉ.एन.एल.नरळे यांनी केले आहे

      
सदर प्रशिक्षणाचा कालावधी दि. ०९ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत असून,प्रशिक्षाणार्थ्यांसाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असणे अपेक्षित आहे. तसेच सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी १००/- रुपये आकारण्यात येईल सोबत शाळा सोडण्याचा दाखला,जातीचा दाखला,आधार कार्ड,फोटो जोडणे आवश्यक आहे. 
      
सदर प्रशिक्षणासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ.एस.एम. बोधनकर,सधन कुक्कुट विकास गट,नेहरू नगर,बी.पी.एड. कॉलेज जवळ,सोलापूर,यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नरळे यांनी केले आहे.