Ticker

6/recent/ticker-posts

गांधी यांच्याबद्दलची अपमानजनक विधाने...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलची अपमानजनक विधाने गायक अभिजित भट्टाचार्य याला भोवणार ! 

गांधीप्रेमी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी ॲड.असीम सरोदे यांच्यातर्फे  पाठवली नोटीस

पुणे : लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे,कायदा शास्त्राचे विद्यार्थी मोनीशा पारेख,मुस्कान सतपाल,श्रुती दुबे,गायत्री वरेकर, कुलसुम मुळानी,ओम भंडारी,सोहम कुलकर्णी,ओम बंचोडे, सुमेध सरोडे गायक अभिजीत भट्टाचार्य याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. 




ही नोटीस पुढील प्रमाणे - प्रती. अभिजीत भट्टाचार्य 

१) भारताला जगभरात महात्मा गांधी यांचा देश म्हणून ओळखले जाते आणि मान्यता प्राप्त आहे. अलीकडे संगीतकार आर.डी.बर्मन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये तुम्ही तुलना करून महात्मा गांधींचा अपमान केला आहे. 
२) आपण "महात्मा गांधी हे भारताचे नाही,तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते" असे सांगून मर्यादा ओलांडल्या आहेत. आपण वरील मूर्ख विधाने करताना भारत नेहमी अस्तित्वात होता आणि पाकिस्तान चुकून निर्माण झाला असे दावा केला. या विधानातून भारत देश  महात्मा गांधीजी यांच्याविषयी आपल्या मनात द्वेष दिसून येतो.

३)अशा विधानांवर समाज माध्यमांवर जोरदार टीका करण्यात आली. लोकांनी आपल्या विधानाचा निषेध केला.

४) अवघ्या जगाला महात्मा गांधीजींच्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा चांगलाच परिचय आहे. महान स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांनी गांधीजींसाठी सर्वप्रथम  ‘राष्ट्रपिता’ असा शब्द वापरला. 

५) तुम्हाला हे माहिती असायला हवं की जगभरातील १५० पेक्षा जास्त देशांमध्ये महात्मा गांधींना अभिवादन  करण्यासाठी टपाल तिकिटे  छापण्यात आली आहेत.

६) आजकाल सरकारची मर्जी मिळवण्यासाठी किंवा पुरस्कार आणि मान्यता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात,काही लोक तुमच्यासारख्या वादग्रस्त विधानांचा वापर करतात.




७) तुमच्यासारख्या व्यक्तीस भारताच्या स्वातंत्र्याचा खरी इतिहास शिकण्यासाठी प्राथमिक शाळेत परत जाण्याची आवश्यकता आहे.

९) महात्मा गांधींनी हिंदू–मुस्लिम ऐक्यासाठी आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम केले.

१०) समाजातील सुजाण नागरीकांना ही माहीत आहे,की तुम्ही बेरोजगार आहात. चित्रपटसृष्टीत काम मिळत नसल्याने तुम्ही अशी अज्ञानपूर्ण,जबाबदारी नसलेली विधानं फक्त प्रसिद्धीसाठी करत आहात. महात्मा गांधींची बदनामी करून प्रसिध्दी मिळवत आहात. 


११)  ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते चुनीभाई वैद्य यांनी लिहिलेल्या एका लहान पुस्तिकेची प्रत या पत्रासोबत जोडली  आहे. वैद्य हे एक समर्पित सर्वोदय कार्यकर्ते होते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्यासारख्या महान व्यक्तीचा अपमान करून तुम्ही सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहात,म्हणून हे पुस्तक तुमच्या गंजलेल्या मानसिकतेला सुधारण्याचा प्रयत्न करेल. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी,असा सल्ला आम्ही देत आहोत. 

१२) आम्ही तुम्हाला या कायदेशीर नोटिसद्वारे तुम्हाला सुचित करीत आहोत,की,जर तुम्ही हे पत्र पोहोचल्यावर १५ दिवसांच्या आत लिहिलेली माफी मागितली नाही,तर  पोलिसांकडे तसेच न्यायालयात जाऊन तुमच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५३ अंतर्गत सार्वजनिक अव्यवस्था आणि कलम ३५६ अंतर्गत बदनामीसाठी फौजदारी तक्रार दाखल केली जाईल.

१३) आम्ही आशा करतो की तुम्ही हा कायदेशीर सूचना गंभीरपणे घ्याल. अन्यथा,खरे भारतीय नागरिक जे या राष्ट्रावर आणि राष्ट्रपित्यावर जीवापाड प्रेम करतात,ते या राष्ट्राची आणि राष्ट्रपित्याची प्रतिष्ठा यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रयत्न करतील.