प्रति, मा.राज्यपालसो, राजभवन,महाराष्ट्र राज्य.
यांना सप्रेम नमस्कार......
मा.महोदय,
लॉर्ड बुध्दा इंटरनॅशनल युनिवर्सिटी निर्माण कृती समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक डॉ.गौतम बेंगाळे व सहकारी यांचेकडून आलेल्या निवेदनाची प्रत सोबत देत आहे. भारतभुमी ही तथागत गौतम बुध्दांची जन्मभूमी आहे. तथागत गौतम बुध्दांनी भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रथम 'नालंदा व तक्षशीला' विद्यापीठ स्थापन केले. त्यामुळे भारत देशात अनेक वर्षांपासून कला,भाषा,बंधुत्व,अहिंसा,शांती, समता,न्याय,स्वतंत्र यातत्वाचे शिक्षण दिले जाते. अशा गौरवशाली भारतभुमीवर लॉर्ड बुध्दा इंटरनॅशनल युनिवर्सिटी असे नाव धारण केलेले किंवा असे असलेले एकही विद्यापीठ नाही.
याबाबत निवेदनामधील मुख्य संयोजक सहका-यांनी मौजे घेरापुरंदर,ता.पुरंदर जि.पुणे येथे विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस केलेला आहे. याबाबतीमध्ये शासन दरबारी अनेक पत्रव्यवहार त्यांनी केलेले आहेत. तरी ग्रामीण भागातील तरुण मुलामुलींना आत्मनिर्भर बनण्याची व राष्ट्रनिर्मीतीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लॉर्ड बुध्दा इंटरनॅशनल युनिवर्सिटीची मागणी पुर्ण करणे विषयी नम्र विनंती. विनंती चे पत्र सांगलीचे खासदार विशाल बापू पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना पत्र पाठवले आहे
