प्रभाग २६ मधील दुर्लक्षित पंचवटी नगर व अवंती नगर येथील स्थलांतरित नागरिक भोगतायेत नरक यातना या संदर्भात महापालिका आयुक्त यांना दिले निवेदन.
सोलापूर : प्रभाग २६ मधील एस आर पी कॅम्प च्या पूर्वेस पंचवटी नगर येथे सुमारे ४० ते ५० घरे असून ते गेल्या २० ते ३० वर्षापासून वास्तवास असून त्यांना मूलभूत सुविधा ड्रेनेज,पाण्याची,पाईपलाईन,दिवाबत्ती,अंतर्गत रस्ते ह्या सुविधा अद्याप पर्यंत झालेल्या नसून ते विकासापासून वंचित आहेत तेथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्ट्रीट लाईटचे पोल असून त्यावर बंद पडलेले ट्यूबलाइट जवळपास सहा वर्षांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळेस भयाण परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे रात्री चोरांचा सुळसुळाट सुरू असून अनेक गैरप्रकार घडत आहेत रात्रीच्या वेळेस महिलावर्ग,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी यांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झालेले आहे ते एक प्रकारे जंगलातच राहतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अवंती नगर पासून संभाजी महाराज पुतळ्यापासून जाणाऱ्या रोडवर असलेले घरे रस्त्याला अडथळा येत असल्यामुळे त्यांना प्रभाग २६ मधील पंचवटी नगरलगत स्थलांतरित केले असून त्यांना महापालिकेच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड मारून दिलेले आहेत परंतु त्यांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसून आजूबाजूचा परिसर झाडी झुडपे वाढल्यामुळे विषारी सर्प खुलेआम फिरत असून त्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
तेथे फिरते शौचालय आणून ठेवलेत परंतु ते गेल्या सहा महिन्यापासून स्वच्छता न केल्याने दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे डासाचा प्रादुर्भाव वाढला असून मलेरिया सदृश्य आजार होत आहेत. तेथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत लाईटची व्यवस्था करणे गरजेचे असताना सुद्धा तेथे अद्याप दिवाबत्तीची सोय झालेली नाही. त्यामुळे सदर नागरिक नरक यातना भोगत आहेत.
सदर समस्या तात्काळ दूर कराव्यात म्हणून महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन दिले असून त्यावर लवकरच उपाययोजना करू असे ठोस आश्वासन दिलेले आहे. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, झाडबुके मेंबर,शंकर देशमुख,जगताप काका,कांबळे सर,कोळी काका,रामभाऊ पवार,गुरव काका आधी उपस्थित होते.