Ticker

6/recent/ticker-posts

आत्ता लोकशाही दिन होणार नाही...

आचारसंहिता कालावधीत जिल्हा लोकशाही दिन होणार नाही

सोलापूर : दि.१९ (एमडी२४न्यूज)  अतिरिक्त मुख्य निवडणुक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र दि.१५ ऑक्टोबर २०२४ अन्वये  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चा कार्यक्रम घोषित झाल्याने निवडणुक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्हयामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकांची आचार संहिता दि. १५ ऑक्टोबर २०२४ ते २५ नोव्हेंबर,२०२४ पर्यंत असल्याने शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक अन्वये आचार संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करु नये असे नमूद केलेले आहे. 




     
त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची आचार संहिता असल्याने या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयात  दरमहा पहिल्या सोमवारी होणारा जिल्हा लोकशाही दिन (माहे नोव्हेंबर २०२४) मध्ये आयोजित केला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.