Ticker

6/recent/ticker-posts

सुप्रीम कोर्ट कमिटीचे चेअरमन सेवानिवृत्त न्यायाधीश सप्रे जिल्हा दौऱ्यावर


सोलापूर : दि.२० (एमडी२४न्यूज) सर्वोच्च न्यायालय स्थापित रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे निवृत्त न्यायमुर्ती हे दिनांक १७ ते २४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

दिनांक २० ते २२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान अध्यक्ष हे सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने रस्ते सुरक्षेशी निगडीत विभागांचे अधिकारी,रस्ते सुरक्षेच्या संदर्भाने काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच धाराशिव व बीड जिल्ह्यातील रस्ता संबंधित कार्य करणारे कार्यकारी अधिकारी यांचेसोबत आढावा बैठक घेणार आहेत अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपागर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.