सोलापूर : दि१९ (प्रतिनिधी) सोलापूर महानगरपालिकापरिवहन कर्मचा-यांना व सेवानिवृत्त कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागु करणेबाबत व सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे सन १९८४,१९८७, १९८८, १९९०.१९९२ पासून बदली सेवा करुन सन २००९ ते २०१५ या कालावधीमध्ये कायम झालेल्या कार्यरत व कायम सेवा पूर्ण करुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी प्रचंड ओढाताण करावी लागत आहे. सोलापूर महानगरपालिका अधिकारी, कर्मचा-याना व सेवानिवृत्त कर्मचा-यांना दि.०१/०१/२०२२ पासून सातवा वेतन आयोग लागू करणे आला आहे. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम हा महानगरपालिकेचा एक विभाग असताना परिवहनः उपकमाकडील अधिकारी, कर्मचा-यांना व सेवानिवृत्त कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागु करणेत आलेला नाही. ही बाब समस्त परिवहन कर्मचा-यांवर अन्याय करणारी आहे. अशा अनेक विषयांना घेऊन सोमवार दिनांक 26 जून रोजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी यांनी दिली.
सोमवार दिनांक - 19 जून रोजी लाल बावटा महानगरपालिका युनियन च्या वतीने कॉ.व्यंकटेश कोंगारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात तौफिक शेख, सुरेश बागलकोट, कॉ.अयुब शेख, काँ.सतीश दाभाडे,कॉ. महिबुब शेख,कॉ.अंबादास हुच्चे, कॉ.आसिफ लालकोट आदींचा समावेश होता.
सदर निवेदनात म्हटले की, सोलापूर महानगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व महानगरपालिका व कामगर युनियन यांच्यामध्ये दि. १९ डिसेंबर १९७७ रोजी झालेल्या कराराप्रमाणे म.न.पा. कर्मचा-याप्रमाणे परिवहन उपक्रमाकडील कर्मचा-यानां व सेवानिवृत्त कर्मचा-यांना अ वा वेतन आयोग लागु करणे बंधनकारक असताना, परिवहन उपकमाकडील कामगार कर्मचा-यांना ७ वे वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे परिवहन उपक्रमाकडील कर्मचा-यांचे व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.
परिवहन उपक्रमाकडील कर्मचा-यांना व सेवानिवृत्त कर्मचा-यांना ६ वे वेतन आयोगाप्रमाणे ८०% व ११९% महागाई भत्ता त्यांचे वेतनात व निवृत्तीवेतनात दिले जात आहे. परिवहन उपक्रमाकडील कम्रचा-यांना मिळणारे तुटपुजे वेतनात व निवृत्ती वेतनात अत्यावश्यक गरजा पूर्ण होत नसून आर्थिक अडचण भासत आहे. त्यामुळे परिवहन कामगारानां त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे कुटूंबाचे
अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यांसाठी परिवहन - उपक्रमाकडील कर्मचा-यांना व निवृत्तं कर्मचा-यांना ७ वे वेतन आयोगाप्रमाणे वेतन व निवृत्ती वेतन मिळणे आवश्यक आहे.
प्रधान सचिव नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई. ३२ यांचेकडे परिवहन उपक्रमाकडील सन १९८४, १९८७, १९८८.१९९ १९९२ पासून बदलीवर सेवा करून सन २००९ ते २०१५ सालाचे कालावधीमध्ये कायम झालेल्या कार्यरत व कायमसेवा करुन नियत वयोमान पूर्ण होवून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन) नियम १९८२ अन्वये निवृत्तीवेतन ०व इतर अनुषंगिक सेवा लागु करणेबाबत मा. आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी प्रकरणी मार्गदर्शन मिळणेस्तव दि१८/०५/२०२२ ने प्रस्ताव सादर करणेत आले असता, कक्ष अधिकारी, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई ३२ यांनी कं. सोमपा- २०२१/प्र.क. ४८० / न. वि. ११ दि. १३/१०/०२२ ने प्रकरणी आपले स्तरावर निर्णय घेणेबाबत कळविले आहे.
नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई ३२ यांचे मार्गदर्शन पत्राप्रमाणे परिवहन उपक्रमाकडील सन २००९ ते २०१५ कालावधीत कायम झालेल्या कर्मचा-यांना व कायमसेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना निवृत्ती वेन मिळणेबाबत लालबावटा महानगरपालिका कामगार युनियन (सिटू) यांचेकडून मा.आयुक्त व परिवहन व्यवस्थापक यांना अनेकवेळा निवेदन देवुन सातत्याने पाठपुरावा करून कामगार हिताचा निर्णय घेण्यांबाबत विनंती करण्यात आली आहे. निवेदन दिल्यानंतर प्रत्येकवेळा आश्वासन देण्यांत आले. परंतु प्रकरणी अदयापपर्यंत निर्णय झालेला नाही.
परिवहन कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांना ७ वे वेतन आयोग लागु करणे व परिवहन उपक्रमाकडे सन १९८४, १९८७, १९८८, १९९० १९९२ पासून बदली सेवा करुन सन २००९ ते २०१५ या कालावधीमध्ये कायम झालेल्या कार्यरत व कायम सेवा पूर्ण करुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन मिळणेबाबत मनपा आयुक्त सोलापूर यांचेकडून निर्णय होण्यासाठी परिवहन कर्मचा-यांना प्रकरणी न्याय मिळणेस्तव व मागण्यांच्या पुर्ततेस्तव माजी आमदार मा. आडम मास्तर यांचे नेतृत्वात परिवहन कामगारांचा दि. २६/०६/२०२३ सोमवार रोजी दुपारी ४.०० वा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयापासून महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारा समोर मोर्चा आयोजित करणेत आला आहे.