Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने आपले ध्येय गाठावे

महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचे प्रतिपादन

महापालिका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप

सोलापूर : दि.२२ (एमडी24न्यूज) महापालिका पत्रकार संघाने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटपाचा एक स्तुत्य उपक्रम घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी नक्कीच बळ मिळेल. विद्यार्थ्यांनीही जिद्द,चिकाटी,मेहनतीने आपले ध्येय गाठावे असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मंगळवारी केले.
         

महापालिका पत्रकार संघाच्या वतीने महापालिकेच्या बीटवरील पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम महापालिकेतील महापालिका पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारंजे बोलत होते. 
     
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता संजय धनशेट्टी,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महापालिका पत्रकार संघाचे सल्लागार प्रशांत जोशी,प्रशांत माने,समाधान वाघमोडे ,महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, उपाध्यक्ष अजित उंब्रजकर आदी उपस्थित होते.
      

कारंजे पुढे म्हणाले,महापालिका पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक भान राखून शालेय साहित्य वाटप कार्यक्रम राबविला. हा स्तुत्य उपक्रम आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो. पत्रकारांच्या लेखणीमुळे परिवर्तन होते. महापालिका प्रशासन,पत्रकार हे एकाच गाडीचे दोन चाके आहेत. दोघे मिळून काम केल्यास सोलापूर शहराचा विकास होऊ शकेल असेही कारंजे म्हणाले.
     
अभियंता धनशेट्टी म्हणाले,महापालिका पत्रकार संघाने आजचा हा स्तुत्य उपक्रम घेतला आहे. पत्रकारांच्या पाल्यां बरोबरच समाजातील इतर गोरगरिबांना सोबत घ्या, त्यांनाही शैक्षणिक मदत मिळणे गरजेचे आहे. दहावीपर्यंतच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना  इतर संस्था तर्फे आपण मदत करू, माझी मदत लागली तर मी कधीही मदत करायला तयार आहे ,असेही धनशेट्टी यांनी सांगितले.
       

यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,ज्येष्ठ सल्लागार प्रशांत जोशी,प्रशांत माने यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भगवा आखाडा प्रतिष्ठान तर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सल्लागार समाधान वाघमोडे यांचा गौरव करण्यात आला.
    
महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी प्रास्ताविक यांनी केले. तर सूत्रसंचालन कांचन हुन्नुरे,पत्रकार विजय गायकवाड यांनी केले तर आभार पत्रकार जाकीरहुसेन पिरजादे यांनी मानले.

विद्यार्थी दत्तक योजना राबवावी - धनशेट्टी सोलापूर महापालिका पत्रकार संघाने पत्रकारांच्या पाल्याबरोबर गोरगरिबांना ही सोबत घेऊन शैक्षणिक साहित्य वाटप करावे त्यासाठी विद्यार्थी दत्तक योजना राबवावी. दहावीपर्यंतच्या शिक्षणाची यामुळे सोय होईल. यातूनच उच्चपदस्थ अधिकारी घडतील,असेही धनशेट्टी यांनी सांगितले.