Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई उच्च न्यायालयातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीस जामीन मंजूर!

मुंबई उच्च न्यायालयातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी ५८ वर्षीय आरोपीस सशर्त जामीन मंजूर!

सोलापूर : सोलापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या ५८ वर्षीय संशयित आरोपी बुडण रहिमबक्ष बागवान (राहणार,सोलापूर) यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. सदर बझार पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गु.र. क्र. ०३०३/२०२४ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३७६, ३७६(२) (एन), ३७७ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, १७, २१ अन्वये २७ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणात,सोलापूरमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय पीडितेवर संशयित आरोपी बागवानने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पीडितेने सुरुवातीला भीतीपोटी कोणालाही सांगितले नव्हते,परंतु सततच्या त्रासाला कंटाळून तसेच आरोपी हा पीडित अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिला कशाची तरी फूस लावून तिच्याशी वारंवार गैरवर्तन करत होता. तथापि,पीडितेने तिच्या आईच्या मदतीने समाजातील काही व्यक्तींचा आधार घेऊन अशा प्रकारची फिर्याद पोलिसांत दाखल केली होती. सदर आरोपीचा जामीन अर्ज सोलापूर येथील विशेष न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आरोपी बागवानने आपला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. 

सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. अद्वैत शुक्ला,ॲड.दत्तात्रेय कापुरे यांनी काम पाहिले,तर सरकारतर्फे ॲड.अ.अ.पालकर यांनी काम पाहिले.