जागतिक योग दिवसाचे औचित्य साधुन बुधवार दिंनाक 21.06.2023 रोजी डॉ.बाबासाहेब आबेडकर रेल्वे क्रिडा संकुल,सोलापुर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सोलापूर मंडल मधिल रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
या शिबिराचे उद्घाटन सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना दोहरे यांनी जागतिक योग दिनाचे महत्व विशारद करताना 21 जुन हा जागतिक योग दिवस म्हणुन घोषित करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान असल्याचे सांगितले तसेच त्यांनी आपल्या रोजच्या जिवनात योग अभ्यासाचे महत्व सांगितले.
त्यानंतर योगगुरु बापुराव जगताप यांच्या मार्गदर्शना खाली उपस्थितांना योग प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी जी.पी.भगत,वरिष्ठ मंडल अभियंता (समन्वय) चंद्रभूषण,वरिष्ठ मंडल वित्त प्रबंधक विवेक होके,वरिष्ठ मंडल सिग्नल एंव दुरसंचार इंजिनियर राहुल ग़ौड,वरिष्ठ मंडल सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम, मंडल कार्मिक अधिकारी मच्छिंद्र गळवे,सहाय्यक सुरक्षा आयुक्त कबीर कुमार दास आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडल कार्मिक अधिकारी मच्छिंद्र गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कल्याण निरीक्षक सचिन बनसोडे,महावीर निमाणी,अक्षय गर्दने, अरविद खडाखडे,पंकज कुमार,शिल्पा ढेपले,कार्यालय अधिक्षक अजय लोंढे व त्यांच्या सहका-यांनी विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंन्द्र मानेकरी यांनी केले.