सोलापूर : दि.२३ (एमडी24न्यूज) सोलापूर शहराच्या हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की सोलापूर महानगरपालिका अंतर्गत सन २०१५ पासुन स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची प्रभावी अंमलबजावणी करणेत आली असुन सदर अभियान कालावधीत वैयक्तिक शौचालयाचे एकूण उद्दिष्ठ २१,३४५ इतके असुन सदर लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयचा लाभ देण्यात आलेला आहे.
त्यानुसार सदर लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज मंजुरीअंती प्रथम हप्ता स्वरूपात र.रु.६०००/- व बांधकाम पुर्ण झाले नंतर दुसरा हप्ता स्वरूपात रु. ९०००/- रक्कम वितरित करणेत आले असुन सन २०२०-२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९ या जागतिक महामारी मुळे ज्या नागरिकांना आपले वैयक्तिक शौचालय बांधकाम पुर्ण करता आलेले नाही व त्यामुळे दुसरा हप्ता प्राप्त झालेला नाही अशा लाभार्थ्यांनी सर्व संबंधित कागदपत्रे घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभाग, सो.म.पा.पत्ता- दुसरा मजला,सह्याद्री शॉपिंग सेंटर, एम्प्लॉयमेंट चौक,सोलापूर-४१३००२ येथे अथवा खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर दि.३०/०६/२०२३ अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क करून आपले शौचालय बांधकाम पुर्ण झालेला Geo-Tag फोटो देऊन दुसऱ्या हप्त्याची मागणी द्यावयाची आहे.
सदर तारखेनंतर येणारे कोणत्याची लाभार्थीच्या मागणीचा विचार केला जाणार नाही,याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे अवहान उपायुक्त
मछिंद्र घोलप यांनी केले आहे.
मुख्य आरोग्य निरीक्षक यांचे नावं व मोबाईल क्रमांक
झोन क्र.1. मोबाईल --9423993426. सूर्यकांत लोखंडे
झोन क्र.२ मोबाईल - 9423993429. वासुदेव नडीमेटला
झोन क्र.३ मोबाईल 9423993902. केदारनाथ गोटे
झोन क्र.४ मोबाईल - 9423993766. विजयकुमार तमशेट्टी
झोन क्र.५ मोबाईल - 9423993421.
बाबासाहेब इंगळे
झोन क्र.६ मोबाईल -79423993907. सुधाकर नागटिळक.
झोन क्र.७ मोबाईल 9423993906.अन्वर शेख.
झोन क्र.८ मोबाईल --9423993428. शकीलअहमद नल्लामंदू