जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष गणेश निळ आणि प्राचार्य सुषमा निळ मुख्याध्यापिका सुवर्ण माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना गणेश नीळ म्हणाले,थोर क्रांतिकारक आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा फुले यांचे कार्य आजही समाजाला दिशा दाखवण्याचं काम करत असून आजच्या विज्ञान युगात सुद्धा अज्ञान, अंधश्रद्धा,धर्म भोळेपणा,खुळसट कल्पना यामुळे नरबळी सारखे प्रकार होतात.
शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्यामुळे समाजातील स्त्रिया सर्वप्रथम शिकल्या पाहिजेत यासाठी महात्मा फुले यांनी संपूर्ण आयुष्य झिजविले. त्यांच्या त्यागामुळेच आजची स्त्री ही सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर दिसत आहे.
देव भोळेपणात अडकून न पडता आजच्या काळामध्ये विज्ञानाचा आधार घेऊन युवकांनी प्रगतीच्या वाटा शोधल्या पाहिजे असं त्यांनी यावेळी बोलताना शेवटी सांगितले.
प्रास्ताविक दादासाहेब नीळ यांनी केले.यावेळी प्राचार्या सुषमा नीळ आणि मुख्याध्यापिका सुवर्णा माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक विश्वनाथ उपाध्ये,अर्चना औरादे, अश्विनी नीळ,तेजश्री कुलकर्णी,अस्मा सय्यद,मीरा माने महादेवी माने,प्राजक्ता पाटील,स्नेहा शिंदे,संकेत मोरे,दीपक भोसले,माऊली भोसले,क्षितिजा भोसले,मनीषा सुरवसे आधी सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वैभव मसलकर यांनी आभार प्रदर्शन केले.