Ticker

6/recent/ticker-posts

आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर,यांच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी सखाराम साठे यांची निवड


सोलापूर : दि.०९ (प्रतिनिधी)  गेल्या पंधरा वर्षापासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर, यांच्यावतीने यंदाच्या वर्षी दिल्या जात असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षकांची पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली. त्यात मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील समता हायस्कूलचे सहशिक्षक सखाराम जालिंदर साठे यांची राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार वितरण सोहळा ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वा. येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने एका पत्रकान्वये देण्यात आली.

आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर जिल्हा सोलापूर शाखेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिक्षक दिनानिमित्त या गुणवंत शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. 

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आविष्कार फौंडेशन, इंडिया (कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य) ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय सांस्कृतिक क्षेत्रात गेली १५ वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. २०२२ च्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाहीर झालेल्या पुरस्कारांचा वितरण सोहळा सोलापूर येथे संपन्न होत आहे. या शानदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक शाखा) दिपक आर्वे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बार्शी येथील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने असतील तर सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार, जालना जिल्हा सेक्रेटरी (आविष्कार फौडेशन, इंडिया), प्राचार्य डॉ. भरत खंदारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाचे संयोजक जब्बार शिकलगार (सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष, आविष्कार फौंडेशन, इंडिया) आणि कु. विनाश्री निंबर्गी, (सोलापूर शहर अध्यक्ष, आविष्कार फौंडेशन, इंडिया) असून • कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पत्रकार संजय पवार (संस्थापक अध्यक्ष, आविष्कार फौंडेशन, इंडिया) असल्याचे सांगण्यात आले.

या सोहळ्यात वरील प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण होत असून या सोहळ्यात सावळेश्वर येथील सहशिक्षक सखाराम गोविंद साठे यांनाही गौरविण्यात येणार असल्याचे साठे यांना कळविण्यात आले.