Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकांच्या योगदानामुळेच समाजाची प्रगती विद्याताई पोळ - उपायुक्त,सो.म.पा.

सोलापूर : दि.०६ (प्रतिनिधी)  शिक्षकांच्या योगदाना मुळेच समाजाची प्रगती होत असते,ते केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत नसुन त्यांचे जिवन घडविण्याचे काम करीत असतात असे गौरव उद्गार महानगरपालिकेचे उपायुक्त विद्याताई पोळ यानी काढले.  त्या अखिल भारतीय उर्दू साहित्य समितीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या गौरव समारंभात प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना काढल्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑर्कीड कॉलेजचे प्राध्यापक इसाक मुजावर होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माजी महापौर तथा संस्थेचे अध्यक्ष ऍ़ड.यु.एन.बेरिया यांनी केले.   


अ.भा.उर्दू साहित्य समितीतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शहरातील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील चार मुख्याध्यापक, सहा शिक्षक व दोन प्राध्यापक तर एक क्रिडा शिक्षक अश्या तेरा अध्यापन करणाऱ्या गुरुजनांचा उत्कृष्ठ मुख्याध्यापक व शिक्षक म्हणुन स्मृतिचिन्ह, गौरवपत्र,शॉल,भेटवस्तु व पुष्पहार घालुन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला.  उपायुक्त विद्याताई पोळ पुढे बोलताना म्हणाल्या की, उर्दू हि गोड भाषा असुन सर्व समाजाची आहे, ती टिकली व वाढली पाहिजे.  एकमेकांनी विविध भाषा आत्मसात केल्यास जिव्हाळा निर्माण होतो.  



अध्यक्ष पदावरुन बोलाताना प्राध्यापक मुजावर यांनी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन ईश्वराला स्मरुण ज्ञान दानाचे काम करावे व नवीन पिढीला घडवुन देशाची उन्नती करावी असे सांगितले. याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमी तर्फे पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा हि यथोचित सत्कार करण्यात आला.  

पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पैकी जुल्फीकार नदाफ व आसिफ इक्बाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास संस्थेचे सचिव अखलाक शेख, विकार शेख, रफिक खान, नसीर आळंदकर, अय्युब नल्लामंदु, हुसेन बक्षी सर, जावीद उस्ताद, याकुब मंगलगिरी, इक्बाल शेख, हारुण बंदुकवाला, प्राचार्य जब्बार शेख, रफीक नल्लामंदु हजर होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक रियाज वळसंगकर यांनी केले तर शफी शेख कॅप्टन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.  

पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व शिक्षक एजाजअहमद जैनोद्दिन शेख सिटीझन हायस्कुल - मुख्याध्यापक डोंगरी जमेलाखातुन फकीरसाब नॅशनल हायस्कुल - मुख्याध्यापक अस्लम अय्युब अचकल सोशल कॉलेज - प्राध्यापक जमील अहमद गुलाबसाब दखनी कमरुन्निसा ज्युनियर कॉलेज - प्राध्यापक रईसा बेगम अ.रऊफ शेख कॅम्प प्राथमिक शाळा - मुख्याध्यापिका कमरुनिस्सा म.हुसेन रचभरे रचभरे मॉडल स्कुल - मुख्याध्यापिका,रिजवाना समीर रंगरेज कमरुन्निसा हायस्कुल - शिक्षिका झुल्फिकार मोहियोद्दिन नदाफ दि प्रोग्रेसिव्ह हायस्कुल - शिक्षक निलोफर अ.रशीद शेख पानगल हायस्कुल - शिक्षिका म.सादीक चाँदबाशा बागवान म.न.पा. प्राथमिक शाळा- शिक्षक सादेका अ.रशीद शेख सोशल हायस्कुल - शिक्षिका फरहान अ.जब्बार नल्लामंदु पानगल हायस्कुल - शिक्षक म.अली मिरामोहियोद्दिन शेख पानगल हायस्कुल - शिक्षक