Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या मालमत्तेवर अधिकाऱ्यांचा दरोडा ! खळबळजनक घटनेचा पर्दाफाश...

सोलापूर : दि.०६ (प्रतिनिधी)  होय,
महानगरपालिकेच्या मालमत्तेवर घातलाय दरोडा...
महापालिकेच्या खर्चातून उभारण्यात फिवर कोविड केअर झालंय गायब ...
फिवर कोविड केअरसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दोन टपऱ्यापैकी एक टपरी झाली रातोरात गायब...
महानगरपालिकेच्या मालमत्तेची 'काळजी' घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याची घेतली नाही दखल...
जणू ते केअर सेंटर गायब करण्यामागे महानगरपालिकेतीलच कोणा अधिकाऱ्याचा गुंतलेला असावा हात...
ही महानगरपालिका आहे, सोलापूरची !
सोलापूर महानगरपालिकेत काहीही होऊ शकतं याच मूर्तीमंत उदाहरण म्हणून या गायब झालेल्या फिवर ओपीडी सेंटरवरून होतं स्पष्ट !! 
पोलीस आयुक्तालय आणि पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेले ते फीवर ओपीडी सेंटर रात्रीच्या अंधारात उचललं गेलं...
जे काम चार-चौघांच्या हातानं होणार नव्हतंच मुळी...
ज्या टपरीला उचलण्यासाठी लागणार होते क्रेन अन् वाहतुकीसाठी लागणार होते ट्रेलर...
अशा सर्व साधनांच्या उपयोगानं ती उचलली तर खरं...
ज्या नागरिकांना ते दिसलं ते भाग्यवानच म्हटले जावेत... 
कारण ज्यांच्या हितासाठी ते उभारले होते, त्यांनी तर दुर्लक्ष केलंच त्याआधी जणू पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर महानगरपालिकेच्या मालमत्तेवर पडलेल्या दरोड्याची त्यांना लागली नाही खबर...

आज ते फिवर ओपीडी सेंटर कोणाच्या आशीर्वादाने सोलापूर शहराची हद्द ओलांडून पोहोचलं होतं, दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर शिवारात...
ज्या केअर सेंटरवर ते उभारण्यासाठी अथवा त्याचे श्रेय लाटण्यासाठी छापले होते नेते अन् कार्यकर्त्याचे फोटो...
रविवारी रात्री ते फिवर ओपीडी सेंटर पुन्हा हत्तुर शिवारातून झालं गायब...
त्यास होतं कारण.
त्यास होतं कारण...

' एमडी 24 ' न्यूज नेटवर्क टाकलेला प्रकाशझोत ...

ते ऑफिसर्स क्लब समोरून भूमिगत झाल्यानंतर ते हत्तूर शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात असल्याचे 
' एमडी 24 ' न्यूज नेटवर्कने सर्व प्रथम जनसामान्यांच्या निदर्शनास आणले होते. तेच फिवर ओपीडी
 सेंटर रविवारी,  रात्री धाबे दणाणलेल्या अधिकाऱ्यांनी तेथूनही गायब केलं आणि ते आणून ठेवलंय सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत... जणू त्याची फिवर ओपीडी सेंटर नव्हे उद्या एखाद्या शॉपसाठी ....
तेही महानगरपालिकेच्या अथवा शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून आपला उद्योग चालवण्यासाठी त्याच अधिकाऱ्यांना उपयोगात येईल...
ते अधिकारी की राजकारणी ? 
त्या राजकारण्यांना आहे,
 कोणत्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त...
या प्रश्नाचे उत्तर देतील का,
 महानगरपालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर !!

शंकर देवा, उघडा तिसरा डोळा
अन् बघा नीट, फिवर ओपीडी सेंटर गेलं कुठं ? 
सोलापूर शहरात अंधाराचा फायदा घेऊन अधिकारी तर घालत नाहीत ना दरोडे ?
की, महानगरपालिकेची लाखोंची मालमत्ता चोरीस गेल्यानंतर ती पुन्हा शहरात येण्याच्या मालिकेतील खळबळजनक घटनेचा पर्दाफाश...