सोलापूर : दि.०५ (प्रतिनिधी) मुरारजी पेठ अभिमानश्री येथील प्राचार्य शंकर वडणे व शिवमती सारीका वडणे यांनी आपल्या घरी गौरी पुजन प्रसंगी अनेक बहुजन महापुरुषांच्या विचारांची पुस्तके आरास म्हणुन समोर ठेवले व दोन छत्रपती घडविनारया राजमाता राष्र्टमाता जिजाऊ म्हणजेच रक्षण,विदयेची देवता सावित्रीमाता यांचे म्हणजेच शिक्षण,अशा विर मातांचा गोरव करुन समाजात वेगळया गौरीचें पुजन करुन आगळी वेगळी आरास केली. या वेळी प्राचार्य वडणे बोलताना म्हणाले आम्ही कुटुंबात अशा राजमातांचा विर मातांचा आदर्श ठेऊन सामाजिक सलोखा राखत आहोत.
समाजानेही अशा वेगळया पद्धतीने - गौरीपुजन करावे असे मत मांडले तर सारीका वडणे बोलताना म्हणाल्या महीलांचा सन्मान म्हणजेच गौरींचे सन्मान होय आज समाजात जिजाऊ सावित्री रमाई अहिल्या यांच्या विचारांची गरज आहे समाज परिवर्तनात यांचे विचार रुजवणे गरजेचे आहे असे मत एमडी 24 न्यूजशी बोलताना प्राचार्य शंकर वडणे आणि शिवमती सारीका वडणे यांनी मांडले.