सोलापूर : दिलेल्या.०३ (प्रतिनिधी) सोलापूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक मागासवर्गीय संस्थांना वेटीस धरून खोटे नाटे आरोप करून कोट्यावधी रुपये उकळत आहेत. त्यामुळे भटक्या समाजाचा संस्था अडचणी येत आहेत. त्याचबरोबर समाज कल्याणच्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे दरमहा न करता तीन-तीन महिन्यातून एकदा करीत आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे.
कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून पगारीसाठी - आलेले अनुदान हे कर्मचाऱ्यांचे वेतन आदा न करता टक्केवारीप्रमाणे मलिदा घेऊन जे थकीत वेतन बीले आहेत ते मंजूर करतात. त्यामुळे साहजिकच नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जात नाही तसेच मागासवर्गीय संस्थांना वेटीस धरून गैरकृत करणारे कैलास आडे यांची समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथून बदली करून त्याची चौकशी करण्यासाठी अनेक मागासवर्गीय कार्यकर्ते आमरण उपोषण करीत आहेत व तसेच शासन स्तरावरून चौकशी होण्यासंदर्भात पत्र निघत आहेत परंतु सहाय्यक आयुक्त कैलास आडे हे पैशाच्या जोरावर अनेक प्रकरण दडपत आहेत. त्यांचे विरोधात सोलापूर शहरात व जिल्ह्यात अनेक दैनिकांमध्ये वृत्त वाहीण्यावर त्यांच्या गैरकृत्याबाबत बातम्या प्रसारित होत आहेत परंतु त्याचेवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
सामाजिक कार्यकर्ते दीपक गवळी - यांनी पूनमगेट जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाचे हत्यार उपसल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांची चौकशी इतर विभाग म्हणजेचं सीआयडी,अँटीकरप्शन किंवा अन्य प्रशासकीय विभागाकडे देणे सोयीस्कर असताना समाज कल्याण विभागाकडेच चौकशीचे आदेश देणे हे कितपत योग्य आहे..? आणि कैलास आडे हे त्याच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत मग चौकशी कशी होणार..? म्हणजेच चोरांनीच चोराची चौकशी कशी करणार..? त्याकरिता त्यांची समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथून बदली करून त्यांनी केलेल्या गैरकृत्यची चौकशी सीआयडी किंवा अँटी करप्शन या खात्या मार्फत केल्यास सोयीचे होईल.अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री अनिल चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.