सोलापूर : दि.०३ (प्रतिनिधी) सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावरून फिवर ओपीडी उचलून सोलापूर विजापूर महामार्गावर असलेल्या हतुर गावातील एका शेतात ठेवण्यात आली आहे.याबाबत कसून महिती घेतली असता,तेथील ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले की,सोलापुरातील एका महिला नगरसेविकेने ही फिवर ओपीडी येथे आणून ठेवण्यात आली आहे.महानगरपालिका प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती घेतली असता,मनपा अधिकाऱ्यांना देखील याबाबत काहीच माहिती नाही.कडक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले पी शिवशंकर यांनी यापूर्वी दिलेल्या माहिती नुसार दोन्ही फिवर ओपीडया महानगरपालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात यावे असे आदेश दिले होते.पण या आदेशाची अंमलबजावणी होण्याअगोदर मलिदा लाटणाऱ्यांनी फिवर ओपीडी गायब केली आहे.हीबाब निदर्शनास आणून देऊन देखील महानगरपालिका अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.
अधिकाऱ्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट-
फिवर ओपीडी कुठे आहे ?त्याचा उपयोग सद्यस्थितीत कसा सुरू आहे? त्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे अशी अनेक प्रश्न आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे यांना विचारली असता,त्यांनी याची जबाबदारी माझ्याकडे नाही.भूमी व मालमत्ता या अधिकाऱ्यांना अधिक माहिती विचारा असे उत्तर दिले.मात्र महानगरपालिका मालकीच्या या फिवर ओपीडीची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही.अधिकारी एकमेकांवर ढकलून हाथ झटकत आहेत.
हतुर येथील ग्रामस्थांनी दिली माहिती-
सोलापूर विजापूर महामार्गावर असलेल्या हतुर गावच्या शिवारात ही फिवर ओपीडी ठेवण्यात आली आहे.याबाबत एका शेतकऱ्याकडून माहिती घेतली असता त्याने या फिवर ओपीडीची अधिक माहिती दिली.जवळपास एक महिन्या अगोदर एका कंटेनर मध्ये काही लोकांनी सायंकाळच्या सुमारास आणून ठेवली होती.सोलापूर शहरातील एका काँग्रेसच्या माजी नगरसेविकेने येथे आपल्या नातेवाईकांसोबत आणून ही फिवर ओपीडी ठेवली आहे.येथील शेत त्यांनी खरेदी करण्यासाठी व्यवहार देखील केला होता.पण शेतीचा हा व्यवहार फिस्कटला पण फिवर ओपीडी तिथेच पडून आहे.
फिव्हर ओपीडी बाबत गुन्हा दाखल नाही-
महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या फिवर ओपीडीची चोरी झाली आहे ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे.मात्र आयुक्त पी शिवशंकर,आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे,भूमी व मालमत्ता अधिकारी ,उपायुक्त विद्या पोळ हे सर्व अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.महानगरपालिकेची लाखो रुपयांची मालमत्ता पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरून सोलापूर क्लब समोरून चोरी जाते आणि ती फिवर ओपीडी हतुर येथील एका शेतात आढळते त्यावर कोणीही काहीही हरकत घ्यायला तयार नाहीत.फिवर ओपीडी गायब झाल्याची साधी तक्रार देखील पोलीस ठाण्यात नोंद होत नाही हे आश्चर्य म्हणावे लागेल.किंवा या सर्व गैरप्रकारांत अधिकारीच शामिल आहेतकी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.