सोलापूर : दि.०७ (प्रतिनिधी) पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवार दि.12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सभागृह क्रमांक 1, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली आहे. याबाबत परिपत्रकाद्वारे उपायुक्त (महसूल) नयना बोंदार्डे यांनी कळवले आहे.
विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात येणार असून भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत मागील तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे.