Ticker

6/recent/ticker-posts

नागणसुर कन्नड शाळेतील शिक्षकांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार

अक्कलकोट : दि.०७ (प्रतिनिधी)  तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलामुलींचे शाळेतील सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.


शिक्षक दिनाच्या औचित्य साधून नागणसुर कन्नड मुला मुलींचे शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंचपती बसवराज नागलगांव होते.व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य ओंकार गंगोंडा,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद मठपती,उपाध्यक्ष गजानंद रेवी, शिक्षण तज्ञ शिवशरण सलगरे,सदस्य शरणप्पा मणुरे,भीमाशंकर कवडी,गावचे प्रतिष्ठित बसवराज दोडमनी,ईरणणा शिवमोर्ती, मुख्याध्यापक विद्याधर गुरव,मल्लप्पा कवठे आदी उपस्थित होते.
  
प्रारंभी गणेशोत्सव निमित्त कन्नड शाळेत प्रतिष्ठापन केलेल्या गणेशाची पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन ओंकार गंगोंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
  
या वेळी कन्नड शाळेतील विद्याधर गुरव,मल्लप्पा कवठे,कल्लय्या गणाचारी, शांता तोळणूरे,बसय्या स्वामी,लक्ष्मीबाई देगांव,लक्ष्मीकांत तळवार,शरणप्पा फुलारी,विजयश्री यंटमन, चन्नम्मा बिराजदार,खाजप्पा किणगी आणि अंगणवाडी सेविका जगदेवी ब्रूणापूरे,सविता थंब, भौरम्मा सक्करगी आदींचे शाळा व्यवस्थापन समिती कडून सत्कार करून गौरविण्यात आले.
  
या वेळी बसवराज दोडमनी,शरणप्पा मणुरे,विद्याधर गुरव आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शरणप्पा फुलारी यांनी।मानले.

फोटो ओळ - शिक्षक दिनाच्या औचित्य साधून नागणसुर कन्नड शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे शाळा व्यवस्थापन समिती कडून सत्कार करण्यात आले.या वेळी गावचे सरपंचपती बसवराज नागलगांव होते.व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य ओंकार गंगोंडा,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद मठपती,उपाध्यक्ष गजानंद रेवी, शिक्षण तज्ञ शिवशरण सलगरे,सदस्य शरणप्पा मणुरे,भीमाशंकर कवडी,गावचे प्रतिष्ठित बसवराज दोडमनी ,इरणणा शिवमोर्ती,मुख्याध्यापक विद्याधर गुरव,मल्लप्पा कवठे आदी उपस्थित होते.