Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून अनेक आजारांचे निर्मुलन - दिलीप स्वामी

    
सोलापूर : दि.३० (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लिम्फेटीक फायलेरीया कार्यशाळा पार पडली. किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग रुग्णशोध मोहीम, बाहय लक्षणेयुक्त व अंडवृद्धी रुग्णांची लाईनलिस्ट तयार करणे, हत्तीरोगाबाबत जनजागृती करणे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सीईओ स्वामी बोलत होते. देवी, कॉलरा, नारु, पोलिओ सारखे आजार आज पुर्णपणे निर्मुलन झाले आहे. याकामी आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची प्रचंड मेहनत घेतली आहे. किटकजन्य आजारा बाबत अद्यापही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत यावेळी सीईओ स्वामी यांनी व्यक्त केले. जनजागरणासाठी गरज पडल्यास ग्रामपंचायत निधीतून खर्च करा अशा सूचना ही देण्यात आल्या.
         
या कार्यशाळेत प्रशिक्षण, तपासणी आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. 2004 पासून सोलापूर जिल्ह्यात MDA (मांस ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन)कार्यक्रम सुरू करण्यात आला. 2015 अखेर सर्व वर्षात MDA कार्यक्रम यशस्वी झाल्याने राष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याची विशेष नोंद घेण्यात आली असून जिल्हा हत्तीरोग निर्मुलनाच्या टप्यावर आहे.
 
16 मे ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत हत्तीरोग सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये 

1- हत्तीरोग रूग्णांना MMDPA कीट चे वाटप करणे.
2- जोखमीच्या लोकसंख्येस औषधोपचार करणे.
3- स्थलांतरितांचे सर्वेक्षण.
4- अंडवृध्दी रूग्णांची शस्त्रक्रिया.
5- नियमित सर्वेक्षण करून रूग्ण संख्या नियंत्रित ठेवणे.
या मुद्यांवर प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी डॉ. राजेंद्रकुमार सिंह जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य कन्सल्टंट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितल कुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदिप ढेले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ. अरूण पाथरुटकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रफिक शेख, तालुका आरोग्य अधिकारी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.