Ticker

6/recent/ticker-posts

गुरव समाज गुणवंत विध्यार्थी सन्मान


अक्कलकोट : दि.३० (प्रतिनिधी) गुरव समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू असे सांगून समाजाचा विद्यार्थ्यासाठी नियोजित वसतिगृह बांधकाम पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही सोलापूर जिल्ह्याचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी दिली.
      

ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ भक्त निवास सभागृहात आयोजित गुरव समाजातील गुणवंत विध्यार्थी गुणगौरव समारंभ व पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी म्हास्वामीजीं बोलत होते.     
       
व्यासपीठावर आ. सचिन कल्याणशेट्टी, ह.भ.प.काशिनाथ गुरव महाराज,सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश मोकाशी,मल्लिकार्जुन गुरव,कलबुर्गी पिठाचे राजेंद्र महास्वामीजी, स्वामी समर्थ मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, वकील अनिल मंगरुळे,  शशिकांत जिड्डीमनी, वर्षाताई पाथरकर, प्रशांत गुरव,अक्कलकोटचे अध्यक्ष शिवानंद फुलारी, निलेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
       
खा. म्हणाले गुरव समाज आणि जंगम समाज दोन्ही समाज सारखेच असून देवांचा पूजा करण्याचे मान मिळालेलं आहे.समाज लहान असून सुद्धा जिद्द व चिकाटीने तालुक्याचा ठिकाणी समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी वसतिगृह बांधकाम करण्यासाठी स्वतःचे जागा घेऊन बांधकाम करण्याचे संकल्प घेणे हे कौतुकास्पद आहे.बांधकाम कार्यासोबत समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिले.
  
आ.कल्याणशेट्टी गुरव समाजाचा विकासासाठी मी दिलेल्या शब्दाप्रमाणे बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपये निधी जाहीर केले.आणि समाजातील विध्यार्थी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा नांव उंचावण्याचे आवाहन केले.
      
मागील चार वर्षात अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावातील शेवटच्या समाज बांधवांच्या  घरापर्यंत जाऊन समाज जोडो अभियानद्वारे जनगणना करण्यात आले आहे. तसेच समाजातील संघर्ष कमी करून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केले असून विध्यार्थी वसतिगृह साठी जागा खरेदी आणि बांधकाम कार्यास सढळ हाताने मदत केलेल्या समाज बांधवांच्या कौतुक केले.
         

प्रारंभी समाजातील महालक्ष्मी फुलारी,स्वामींनी पाटील, समृद्धी फुलारी बाल कलाकार नृत्य व गायन करून मनोरंजन केले.संस्कृती गुरव आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व सादर करून उपस्थितांतचे मने जिंकली.तसेच शिला बणजगोळे परिवारातर्फे स्वागत आणि इशस्तवन पार पडले. प्रारंभी स्वामी समर्थ आणि गुरव समाजाचे संत काशीबा महाराज प्रतिमा पूजन करून रोपाला जालार्पण करून कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील १० वी,१२ वी गुणवंत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधव व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य समाजातील माजी सैनिक शिवानंद फुलारी, चंद्रकांत गुरव यांचे सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्याधर गुरव आणि करूणा गुरव यांनी केले तर आभार शरणप्पा फुलारी यांनी मानले.
         
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश फुलारी,स्वामिनाथ गुरव,उदय पाटील,बसवराज फुलारी,शिवानंद पुजारी,काशिनाथ फुलारी, चंद्रकांत फुलारी, डॉ.शिवपुत्र फुलारी,बसवराज गुरव,प्रदीप गुरव,वेदेश गुरव, प्रभाकर गुरव, स्वामीराव गुरव, विजय गुरव, अशोक पाटील, दत्तू गुरव, संजय गुरव, अशोक आवटे, भोगेश फुलारी, ज्ञानेश्वर फुलारी, सोमनाथ गुरव, तुकाराम विंचुरे, दयानंद पाटील, चंद्रकांत पाटील, राघवेंद्र आवटी, लक्ष्मण गुरव आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

चौकट:- १० वी, १२ वी परीक्षेत एक,दोन तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या असे सहा विध्यार्थ्यांना सोलापूरचे शांता पाथरकर यांच्याकडून ५२०० रुपये, बोरगावचे तुकाराम बिराजदार यांच्याकडून ३५०० रुपये, सेवानिवृत्त शिक्षक शिवानंद पुजारी यांनी वडील कै विठोबा पुजारी यांच्या स्मरणार्थ २५०० रुपयेचे बक्षीस मागील दोन वर्षांपासून देण्याचे प्रथा यंदाही कायम ठेवले.

फोटोओळ:- अक्कलकोट येथे आयोजित गुरव समाज गुणवंत विध्यार्थी सन्मान प्रसंगी खा. जयसिद्धेश्वर म्हास्वामीजीं, आ. सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र म्हास्वामीजीं, हभप काशिनाथ गुरव प्रकाश मोकाशी, वर्षा पाथरकर, अनिल मंगरुळे,शिवानंद फुलारी,दिसत आहेत