Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्यांक बहुल शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी/ सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०२२-२३

अल्पसंख्यांक बहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी/ सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०२२-२३

सोलापूर : दि.१४ (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय दि. ७ ऑक्टोबर २०१५  व शासन परिपत्रक दिनांक १५ जुन २०२२ नुसार "धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी/ सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०२२-२३" चे प्रस्ताव पात्र संस्थांकडून मागविण्यात येत आहेत.

             
या योजनेचा लाभ घेण्याकरिता सदर शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणा-या पात्र संस्थांनी सन २०२२-२३ साठीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांचेकडे दि. ३१ जुलै २०२२ पूर्वी सादर करावयाचे होते. तथापि, सदर प्रस्ताव सादर करण्याकरिता शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी पात्र संस्थांनी मुदतीत प्रस्ताव सादर करावेत. दि. ३१ ऑगस्ट २०२२ नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी कळविले आहे.