Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षांचे विध्यार्थी, अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी विशेष पुस्तक प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रकाशन विभागाचा उपक्रम

सोलापूर : दि.१४ (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनचे आयोजन करण्‍यात आले आहे त्‍या प्रदर्शनामध्‍ये  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रकाशन विभाग वतीने विशेष पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आल्‍याचे सहायक संचालक उमेश उजगरे यांनी सांगितले.  

दिनांक 15 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत सोलापूर रेल्‍वे स्‍टेशन येथे सकाळी 9  ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत हे पुस्तक प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. प्रकाशन विभागाची अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके  वाचकांना विशेष सवलतीच्या दरात या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विध्यार्थी, विविध विषयांचे अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी ही पुस्तके अतिशय उपयुक्त आहेत. प्रदर्शनकाळात पुस्तकांच्या खरेदीवर किमान 10 ते कमाल 90 टक्क्यापर्यंत सवलत दिली जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा त्यात समावेश आहे. 

प्रकाशन विभाग ही भारत सरकारची एक प्रमुख प्रकाशन संस्था असून इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान आणि क्रीडा,गांधीसाहित्य,बालसाहित्य विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके तसेच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे, मान्यवरांची चरित्रे यांचा विपुलप्रकाशन संग्रह विभागाकडे अतिशय वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय योजना, कुरुक्षेत्र, बालभारती आणि आजकल ही मासिके या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि त्यांची वर्गणीदेखील स्वीकारली जाणार आहे. विशेष पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे असे आवाहन केंद्रिय संचार ब्‍युरो, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्‍हाण यांनी केले आहे. माहितीसाठी सोबत पुस्‍तकाची यादी जोडली आहे