सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवांतर्गत आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, अरूणा गायकवाड, चारूशिला देशमुख, सोपान टोंपे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार दत्तात्रय मोहाळे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, उत्तरचे जयवंत पाटील यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांनीही ठिकठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन केले.
