Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अचकदानी रोपवनामध्ये वृक्षारोपन वन विभागाचा उपक्रम


सोलापुर : दि.१३ (प्रतिनिधी) आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वन परिक्षेत्र सांगोला विभागामार्फत अचकदाणी ता. सांगोला येथील फॉग.नं. 2012 क.ग.नं.109 मध्ये अटल आनंद घन वन योजनेंतर्गत वृक्षारोपन करण्यात आले.

 
अचकदानी येथील अटल घन वन रोपवनास शहीद भोजलिंग काळेल रोपवन असे नाव देण्यात आले आहे. रोपवनामध्ये शहीद भोजलिंग काळेल यांच्या आई वडिला मोहन काळेल व सुलोचना काळेल यांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  माध्यमिक विद्यालय अचकदानी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते वड, पिंपळ, बदाम, कडुलिंब, आवळा, कांचन, आंबा, पेरू या विविध प्रजातीची वृक्षलागवड करण्यात आली.

            
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अचकदाणीचे सरपंच विजय पाटील, उपसरपंच अमोल मोरे, लक्ष्मीनगरचे सरपंच दीपक बाड, उपसरपंच धर्मराज ऐवळे, वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही.डी.बाठे, सहायक वनसंरक्षक बी.जी. हाके, तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे, शाखा अभियंता बोकडे, कृषी विस्तार अधिकारी जाधव, कृषी सहाय्यक नलावडे, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.