पंढरपूर : दि.१३ (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रभाग क्रमांक पाच मध्ये हर घर झेंडा हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रका द्वारे संघर्ष परिवार संस्थापक अध्यक्ष राहुल परचंडे यांनी दिली.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावा असे आवाहन केले होते.
या आव्हानाला स्वीकारून संघर्ष परिवार संस्थापक अध्यक्ष राहुल परचंडे मित्र परिवार, शहर भाजपा यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ मध्ये ,,"हर घर तिरंगा घर घर तिरंगा" हे अभियान राबविण्यात आले. व प्रभागातील सर्व मतदारांनी ही प्रतिसाद दिला. यावेळी १०० ते १५० घरोघरी तिरंगा ध्वज देऊन लावण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रणव परिचारक, श्रीकांत महाराज हरिदास , ऋषिकेश उत्पात मेंबर, राहुल पटवर्धन , बंडू काका हरिदास, महादेव काका सुपेकर, प्रशांत सापनेकर, विकी परचंडे, वैभव बडवे , उमेश संगीतराव, विशाल खंडागळे, हरिश्चंद्र परचंडे, गणेश मेटकरी, राजाभाऊ घंटी ,सुनील नवले, निखिल परचंडे राकेश परचंडे व असंख्य सहकारी मित्र उपस्थित होते.
