Ticker

6/recent/ticker-posts

अ.भा. उर्दू साहित्य समिती तर्फे शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ठ मुख्याध्यापक व शिक्षकाचे पुरस्कार जाहीर


सोलापूर : दि. २९ (प्रतिनिधी) अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीने शिक्षक दिना निमित्त उल्लेखनिय कार्य केलेल्या उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचा उत्कृष्ठ मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार देऊन सोमवार दि.05/09/2022 रोजी सायं. 6.30 वाजता कॉ.बेरीया शैक्षणिक संकुल नवीन हॉल लष्कर येथे पी. शिवशंकर आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांचे शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.  




कार्यक्रमास प्रमुख अतिथी - म्हणुन प्रशासनाधिकारी संजय जावीर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  उर्दू भाषेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी घेतलेले परिश्रम, राबविलेले विविध उपक्रम तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तु, शाल व श्रीफल देऊन यथोचित गौरव करण्यात येणार आहे.  यंदाच्या वर्षी एकुण 13 जणांना गुणवंत पुरस्तकाराने सन्मानित करण्यात येत असुन यामध्ये प्राथमिक शाळेतील 6, माध्यमिक शाळेतील 4 शिक्षक व मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक विभागातील 2 व क्रिडा विभागातील 1 शिक्षकाचा समावेश आहे.   याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमी मुंबई तर्फे सोलापूर शहरातील ज्या मान्यवरांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांचा हि सत्कार करण्यात येणार आहे. 

पुरस्कार प्राप्त करणारे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक

अ.क्र. शिक्षकांचे नाव शाळेचे नाव पुरस्कार
1 एजाज जैनोद्दिन शेख सिटीझन हायस्कुल मुख्याध्यापक
2 जमेला जहागिरदार नॅशनल हायस्कुल मुख्याध्यापिका
3 अस्लम अय्युब अचकल सोशल कॉलेज प्राध्यापक
4 जमीर गुलाबसाब दखनी कमरुन्निसा ज्युनियर कॉलेज प्राध्यापक
5 रईसा बेगम कॅम्प प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका
6 कमरुनिस्सा रचभरे रचभरे मॉडल स्कुल मुख्याध्यापिका
7 रिजवाना मनियार कमरुन्निसा हायस्कुल शिक्षिका
8 झुफ्किार नदाफ दि प्रोग्रेसिव्ह हायस्कुल शिक्षक
9 निलोफर शेख पानगल हायस्कुल शिक्षिका
10 सादीक बागवान म.न.पा. प्राथमिक शाळा शिक्षक
11 सादेका अ.रशीद शेख सोशल हायस्कुल शिक्षिका
12 फरहान नल्लामंदु पानगल हायस्कुल शिक्षक
13 म.अली शेख पानगल हायस्कुल क्रिडा शिक्षक

टिप : आज झालेल्या पत्रकार परिषदेस म.शफी कॅप्टन, अय्युब नल्लामंदु, म.रफिक खान, नासीर आळंदकर, रियाज वळसंगकर आदी उपस्थित होते.