योगासन, कराटे व कुस्तीमध्ये विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; कबड्डीतही तृतीय क्रमांक
सोलापूर : सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्तर सोलापूर तालुकास्तरीय कुस्ती, कराटे व योगासन स्पर्धा कोंडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
योगासन, कराटे आणि कुस्ती या विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत आपल्या क्रीडा कौशल्याची छाप पाडली.
योगासनमध्ये विद्यार्थ्यांचे यश
१७ वर्षे मुले :
आविष्कार प्रसेंजीत काटे — प्रथम क्रमांक
धनराज रमेश साठे — तृतीय क्रमांक
१९ वर्षे मुले :
शंभुराजे नागेश जाधव — प्रथम क्रमांक
राजवीर विठ्ठल भोसले — द्वितीय क्रमांक
प्रवीण देवीदास जाधव — तृतीय क्रमांक
मुली :
संध्या ज्योतिबा रणदिवे — प्रथम क्रमांक
अक्षरा दिनकर साठे — तृतीय क्रमांक
कराटेमध्ये स्वरा शिनगारेची जिल्हास्तरीय निवड
१४ वर्षे, ३० किलो मुलींच्या गटात स्वरा विरेश शिनगारे हिने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
कुस्तीमध्येही दमदार कामगिरी
१७ वर्षे मुले – ग्रेको रोमन प्रकार :
जीशान जावेद शेख — ६८ किलो — प्रथम क्रमांक
गुरुराज कृष्णात भोसले — ८० किलो — प्रथम क्रमांक
१९ वर्षे मुले :
ओमराज क्षिरसागर — ६३ किलो — प्रथम क्रमांक
१९ वर्षे मुली :
कार्तिकी नागनाथ दळवे — ५२ किलो — प्रथम क्रमांक
प्राजक्ता रमेश निंबाळकर — ५५ किलो — प्रथम क्रमांक
आकांक्षा अनिल शिंदे — ६३ किलो — प्रथम क्रमांक
तसेच १९ वर्षे मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
संस्थापक अध्यक्षांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन - या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, “यशाच्या मार्गावर अनेकजण असतात, पण यश मिळवणारे कमी असतात. आमच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन,” असे गौरवोद्गार काढले.
प्राचार्य सुषमा निळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, “पक्षाला भरारीसाठी पंख लागतात,तसे विद्यार्थ्यांना भरारीसाठी शिक्षक रूपी पंख लागतात. सर्वांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा,” असे सांगितले.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना औरादे,रवी कोतकुंडे, प्रतीक्षा खुणे आदी शिक्षक उपस्थित होते.
जिजाऊ ज्ञान मंदिर व विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
