Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात १५ ऑक्टोंबर रोजी सर्व शाळांत आंतरराष्ट्रीय हात धुणे दिवस - सिईओ कुशल जैन



संकल्प सेवा अभियान

सोलापूर : संकल्प सेवा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडीत जागतिक हात धुवा दिना दिनांक 15 ऑक्टोबर 2026 या दिवशी साजरा करणेत यावा. 
साबणाने हात धुण्याच्या सवयीबाबत जनजागृती व प्रसार करणेचे सुचना आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली. 

स्वच्छता ही सेवा - २०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांत हात धुणे दिवस साजरा करणेचे सुचना आज सिईओ कुशल जैन यांनी दिल्या. सर्व गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत. 


 
15 ऑक्टोंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक हात धुवा दिन (Global Handwashing Day) म्हणुन साजरा केला जातो. आरोग्य संदर्भात हातांच्या स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेवुन या दिवसाचे औचित्य साधुन व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सन 2008 पासुन दिनांक 15 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणुन साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस एक नविन संकल्पना घेवुन साजरा केला जातो यावर्षीची संकल्पना (Be a Handwashing Hero) "हात धुवा नायक व्हा" आहे. संसर्गजन्य आजारांना दुर ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी योग्य पध्दतीने साबनाने हात धुणे हा अत्यंत सोपा, प्रभावी आणी परवडणारा उपाय आहे. लहान मुले, वृध्द आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्याची ही सवय रुजवण्यासाठी खालीलप्रमाणे उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. सर्व ग्रामपंचायत , शाळा व अंगणवाडी मध्ये हा उपक्रम होणे साठी ग्रामसेवक यांनी नियोजन करणेचे सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी दिले आहेत. 


हात धुण्याचे महत्व : जेवणापुर्वी आणि शौचास जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुतल्यास डायरिया (अतिसार) पोटदुखी आणि श्वसनाचे अनेक गंभीर आजार टाळले जातात. 2) हात घुण्याची योग्य पध्दत (20 सेंकद नियम)  नळाच्या स्वच्छ वाहत्या पाण्याने हात ओले करा. हातावर पुरेसा साबण किंवा हॅडवॉश लावा. दोन्ही हातांचे तळवे, बोटांच्या मध्यभागची जागा, नखांखालील भाग आणि मनगट किमान 20 सेकंद चांगले चोळुन स्वच्छ करा. स्वच्छ पाण्याने हात धुवून घ्या आणि कोरडया स्वच्छ कापसाच्या टॉवेलने किंवा हवा (Air Dry) सुकवा. तरी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये,शाळा,अंगणवाडी मध्ये या दिवशी प्रत्यक्ष कृती प्रात्यक्षिक सह जनजागृती माहिम राबवुन हात धुवा नायक व्हा असा संदेशाची जास्तीत जास्त जनजागृती करावी व तसा फोटो व व्हिडीओसह अहवाल सादर करणेचे सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.