सोलापूर : कुटुंब न्यायालय,विजयपूर यांच्या निर्देशानुसार जप्त करण्यात आलेले MH-13-DE-5602 क्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय,सोलापूर यांच्या ताब्यात आहे. या वाहनाचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार आहे.
सदर ट्रॅक्टर वाहनाच्या लिलाव प्रक्रियेबाबत किंवा वाहनाशी संबंधित कोणाची कायदेशीर तक्रार अथवा हरकत असल्यास संबंधितांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत,म्हणजेच ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत,कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय,सोलापूर येथे थेट संपर्क साधून आपली हरकत नोंदवावी,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.
निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या किंवा पुष्टी न झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी विहित मुदतीत आपल्या तक्रारी अथवा हरकती नोंदवाव्यात,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
