जय कुमार गोरेंचा टोमणा नेमका कुणाला
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी दुष्काळाचा पाहिला ट्रिगर जाहीर होताच प्रतिक्रिया दिली. राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्या नंतर राज्यातील बळीराजा संकटात आला. अनेक दिवसांपासून पावसाने दडी दिल्या नंतर शेतकरी राजा संकटात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब दौरा सुरू केला. जेव्हा विरोधक झोपा काढत होते,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधावर गेले, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. व्यथा ऐकून घेतल्या नंतर देवेंद्र फडणवीसांनी 358 तालुक्या पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. एकंदरीत राज्यात 75 टक्के क्षेत्रात दुष्काळ जाहीर झालेला आहे. दुष्काळाच्या सर्व सुविधा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत.
या दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती,लाईट बिल वसुलीला स्थगिती,या कालखंडात शेतकऱ्यांचा वीज कनेक्शन कट करता येणार नाही. शेतकऱ्यांना कुठलाही महसूल भरावा लागणार नाही. कर्जाचा पुनर्गठन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.या सर्व परिस्थिती मध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. चार छावण्या सुरू होतील,जनतेला टँकरने पाणी पुरवण्याच्या सुविधा सुरू होतील. पशुधन वाचवण्यासाठी सर्वकाही उपाययोजना कराव्या लागतील.
काही विरोधक घरी बसून सरकारवर टीका करण्याचा काम करतायत. विरोधकांच्या हातातील हत्यार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतलेला आहे. विरोधक जागे व्हायच्या आत,मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकून दुष्काळ जाहीर केलेले आहे.
