देशभक्तीच्या रंगात रंगला सोलापूरचा ८० वा स्वातंत्र्य दिन
सोलापूर : एनटीपीसी सोलापूर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त एनटीपीसीच्या प्रशासकीय ब्लॉक तसेच बालभवन परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सीआयएसएफ परिसरात केक कापून स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टाऊनशिपमधील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टेडियम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रकल्प प्रमुख मोहन वट्टेकेकट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आपल्या भाषणात मोहन वट्टेकेकट यांनी एनटीपीसी सोलापूरच्या विविध क्षेत्रातील उपलब्धी तसेच विविध विभागांच्या योगदानाचे कौतुक केले. देशाच्या प्रगतीमध्ये एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व अधिकारी,कर्मचारी आणि सहकाऱ्यांना संस्थेच्या तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने योगदान देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास शुभाशिष बंदोपाध्याय,महाप्रबंधक (प्रचालन एवं अनुरक्षण),हेमंत कुमार शाक्य,महाप्रबंधक (प्रचालन एवं एफ.एम.),कन्हैया दास,महाप्रबंधक (मानव संसाधन),शैला मोहन,अध्यक्षा,सुजना महिला मंडळ,प्रवीण कुमार सिंह, असिस्टंट कमांडेंट,तसेच सीआयएसएफसह विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी,सुजना महिला मंडळाच्या सदस्या,सीआयएसएफचे जवान,विविध शाळांचे प्राचार्य व शिक्षक,विद्यार्थी,टाऊनशिपमधील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत - स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते बालकांच्या मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि सीआयएसएफ जवानांच्या मॉक ड्रिलचे. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरणाला साजेशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. सीआयएसएफ जवानांनीही आपल्या शिस्तबद्ध आणि प्रभावी मॉक ड्रिलद्वारे उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एनटीपीसी कर्मचाऱ्यांचा, ळविद्यार्थ्यांचा तसेच सीआयएसएफ जवानांचा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
देशभक्तीच्या वातावरणात उत्साहाला उधाण - देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तिरंग्याच्या रंगात सजलेल्या परिसरामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिकच वाढला होता. उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारे वातावरण निर्माण झाले होते.
एनटीपीसी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला हा स्वातंत्र्य दिन सोहळा देशप्रेम,राष्ट्रीय एकता,कर्तव्यनिष्ठा आणि संस्थेच्या उल्लेखनीय उपलब्धींचा उत्सव ठरला. उपस्थित अधिकारी,कर्मचारी,जवान,विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला.
