कुर्बान हुसेन नगर येथील महमद हाजी बाबूलाल कारचे यांचे निधन
सोलापूर : (निधन वार्ता) कुर्बान हुसेन नगर येथील रहिवासी महमद हाजी बाबूलाल कारचे (वय ४७) यांचे आज गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी व भाऊ असा परिवार आहे.
त्यांचा दफनविधी आज सायंकाळी असरच्या नमाजानंतर जडेसाब कब्रस्तान येथे करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मरहूम यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अल्लाह तआला महमद हाजी बाबूलाल कारचे यांच्या मगरीफत फरमावो, त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
