Ticker

6/recent/ticker-posts

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील


सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील प्रवाशांनी ऑटो रिक्षा प्रवासादरम्यान चालकांकडून होणाऱ्या अवाजवी भाडे आकारणी,प्रवास नकार अथवा गैरवर्तणुकीच्या तक्रारी तात्काळ नोंदवाव्यात,असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय,सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नियमानुसार ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे मागणे, प्रवाशांना इच्छित ठिकाणी नेण्यास नकार देणे तसेच प्रवाशांशी असभ्य वर्तन करणे,अशा तक्रारींच्या निवारणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय,सोलापूर यांच्यामार्फत विशेष तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.


तक्रार नोंदविताना ही माहिती द्या - प्रवाशांनी संबंधित रिक्षाचा वाहन क्रमांक,घटनेची वेळ,ठिकाण आणि घटनेचा तपशील यासह खालील अधिकृत संपर्कांवर तक्रार नोंदवावी.

ई-मेल: mh13@mahatranscom.in / dyrto.13-mh@gov.in  
दूरध्वनी: 0217-2303099  
मोबाईल: 9420564513  

प्रवाशांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रकरणाची पडताळणी करण्यात येईल. तक्रार सिद्ध झाल्यास संबंधित रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे सोलापूर शहर व परिसरातील सर्व रिक्षा प्रवाशांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारास बळी पडल्यास तक्रार निवारण यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.