Ticker

6/recent/ticker-posts

व्वा संघटनेतर्फे बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन उत्साहात साजरे


सोलापूर : व्वा संघटनेच्यावतीने कुमठा नाका येथील ‘आपुलकी बेघर निवारा केंद्रा’त रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी केंद्रातील गोरगरीब, वंचित आणि निराधार बांधवांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेमाने व सन्मानाने राख्या बांधल्या. तसेच मिठाईचे वाटप करून रक्षाबंधनाचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे निवारा केंद्रातील बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या कार्यक्रमास विद्या लोलगे,पुष्पा हलकुडे,मार्था आसादे, शारदा मसुती,शोभा गायकवाड आणि स्वाती मुकणार यांची उपस्थिती होती.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘आपुलकी बेघर निवारा केंद्रा’चे व्यवस्थापक अशोक वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वंचित व निराधार बांधवांसोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा केल्याबद्दल त्यांनी व्वा संघटनेचे आभार व्यक्त केले.

प्रेम,माणुसकी आणि आपुलकीचा संदेश देणारा हा रक्षाबंधनाचा उपक्रम उपस्थितांसाठी भावनिक आणि आनंददायी ठरला.