सोलापूर : (निधन वार्ता) कुर्बान हुसेन नगर येथील रहिवासी नुरोद्दीन ( बुडन ) महिबूब सागर (वय ४६ वर्षे) यांचे कॅन्सरच्या आजाराने उपचारादरम्यान शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले.
नुरोद्दीन (बुडन) महिबूब सागर हे काही काळापासून कॅन्सरच्या आजाराने पीडित होते. त्यांच्या निधनामुळे कुर्बान हुसेन नगर परिसरात शोककळा पसरली असून,नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा अंत्यविधी शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी जोहरच्या नमाज पठाणानंतर, दुपारी २ वाजता कुर्बान हुसेन नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून मोदी कब्रस्तान येथे नेण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई व तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अल्लाह तआला त्यांना जन्नतुल फिरदौस अता करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आमीन.
भावपूर्ण श्रद्धांजली!
