सोलापूर : जिल्हा परिषद शाळा,वारद फॉर्म येथे भारतीय ८० व्या स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मौलाना आझाद महामंडळाचे माजी जिल्हा व्यवस्थापक सी.ए. बिराजदार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास विजयकुमार बमगोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी परिसरातून प्रभातफेरी काढत देशभक्तीचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांनी कवायत सादर करून विविध मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना अवताडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळेच्या शैक्षणिक व विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. यावेळी नशामुक्त अभियानांतर्गत सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याची सामूहिक शपथ उपस्थितांनी घेतली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजू जाधव, अंगणवाडी सेविका स्वाती काकडे व जवंजाळ,तसेच राजू रघुवंशी,कोकणे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक अल्केश अवचारे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
