सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदगीॅ येथील आठवडा बाजारात भाजी विक्री करत असताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी तिघांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस माहितीनुसार,अजिज मौलाली बागवान (वय 26, रा. मैंदगीॅ,तालुका अक्कलकोट,जिल्हा सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटना दि. 17 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास मेडगी येथील आठवडा बाजारात घडली. फिर्यादी भाजी विक्री करत असताना आरोपी नौशाद मन्नान शेख (वय 40), मतीन मन्नान शेख (वय 35) आणि आरिफ मन्नान शेख (वय 37, सर्व राहणार मैंदगीॅ) यांनी फिर्यादीला त्यांच्या गावात भाजी विक्री करण्यास विरोध केला.
यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर हाताने मारहाण करून लोखंडी सळईने डोक्यावर वार केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2) व 352 अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नागनाथ कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असून,आठवडा बाजारातील या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
