Ticker

6/recent/ticker-posts

गोव्यात भारतीय जैन संघटनेचा भ्रमण कार्यक्रम उत्साहात


सोलापूर : जैन समाजासह इतरही समाजात सातत्याने परिवर्तन व्हावे,यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भ्रमण कार्यक्रम 28 ते 31 मे च्या दरम्यान गोव्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्याध्यक्ष केतन शहा,यांनी मायक्रो प्लॅनिंग केले होते,राज्य महामंत्री प्रवीण पारख, सचिवा संतोष बंब गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्नशील होते. भ्रमण कार्यक्रमात राज्यातील 12 विभागांपैकी 7 विभागातील 18 जिल्ह्यातील 150 कार्यकर्त्यांनी सपत्निक सहभाग नोंदविला होता. यात सोलापूर जिल्ह्यातील 42 कार्यकर्ते विमानाने प्रवास करून उपस्थित होते. या चार दिवसीय भ्रमंण कार्यक्रमात बालाजी मंदिर मंगेशी मंदिर,जुना गोवा चर्च,डोना-पोला,जैन मंदिर,डॉल्फिन पॉईंट,बागा बिच,इ स्थळांना भेटी देऊन क्रुझ वरील नृत्य,मनोरंजनात्मक कार्यक्रमात भाग घेतलेले आबाल- वृद्ध आनंद तुटत होते. 






मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन, गोवा राज्याध्यक्ष भरत पाटील,राज्यसचिव राजू देवरमनी इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. "बी.जे.एस्. ही केवळ संघटना नसून परिवाराच्या,समाजाच्या समस्या लक्षात घेऊन, त्यावर उपाय योजना शोधून,अंमलबजावणी करणारी,एक पारिवारिक संस्था आहे. पारिवारिक अदालत,परिणय पथ,स्मार्ट गर्ल, दिलका जिंकसा इ.कार्यक्रम नवीन स्वरुपात आपल्या सोबत आहेत" असे मार्गदर्शन करताना,कोमल जैन म्हणाल्या.
 कोमल जैन यांच्या या आवेशपूर्ण व आंतरिक तळमळीच्या भाषणाने,कार्यकर्ते भारावून गेले होते. त्यातून कार्यकर्त्यांना एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळाली. शुद्ध शाकाहारी जैन भोजन, निवासाची चोख व्यवस्था,पिकप व ड्रॉपची खास व्यवस्था,ए.सी.बस मधून भ्रमंती इ.व्यवस्था अत्यंत चांगली होती.

राज्याध्यक्ष केतनभाई शहा,महामंत्री प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव विजय दुगड,सौ संतोष बंब,माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सौ संतोष बंब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शनानंतर सर्वांनी एकमेकांना जय जिनेन्द्र करुन जड अंत:करणाने निरोप घेतला.