Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी श्री सिद्धेश्वर मंदिरात विशेष आरती; विकासकामांची पाहणी


सोलापूर : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य,उज्ज्वल भवितव्य आणि उत्तम आरोग्यासाठी आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे विशेष आरती करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहरातील सर्व नगरसेवक,नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.



आरतीनंतर उपस्थित मान्यवरांनी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर आणि मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला.

याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते,भाजपा सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर,सभागृहनेते नरेंद्र काळे,श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, देवस्थान समितीचे पदाधिकारी,सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक-नगरसेविका,भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरचे पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक कार्यकाळाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या उत्तम आरोग्य व यशस्वी नेतृत्वासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.