Ticker

6/recent/ticker-posts

भटके विमुक्त आदिवासी कार्यकर्त्यांसाठी क्षमता व संघटन बांधणी कार्यशाळेचे आयोजन


सोलापूर : भटके विमुक्त आदिवासी समाजाच्या हक्क, संघटन आणि नेतृत्व विकासासाठी “क्षमता बांधणी व संघटन बांधणी” या विषयावर एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील कार्यकर्त्यांना सक्षम नेतृत्व, संघटन कौशल्य आणि चळवळीची योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ही कार्यशाळा शनिवार, दि. 23 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता सोलापूर जिल्हा सार्वजनिक वाचनालय, पोलीस हेडकॉटर जवळ, अशोक चौक पोलीस चौकी शेजारी, सोलापूर येथे होणार आहे.

कार्यशाळेत मुंबई येथील मुमताज शेख तसेच पुणे येथील आप्पाराव राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत. भटके विमुक्त आदिवासी समाजासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटी, नेतृत्व विकास आणि सामाजिक चळवळीचे प्रभावी नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.



या कार्यशाळेस भटके विमुक्त आदिवासी समाजासोबत कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजहित चिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी यशवंत फडतरे – 9420751096, मल्लेश सूर्यवंशी – 7391924664, रोहिणी गायकवाड – 9860181247 आणि वैशाली बनसोडे – 7620260120 यांच्याशी संपर्क साधावा.

ही कार्यशाळा भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती, महाराष्ट्र – सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.