Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन...


जालना महापालिकेतील ७ काँग्रेस नगरसेवकांचे निलंबन

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जालना महानगरपालिकेतील ७ काँग्रेस नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ॲड.गणेश पाटील यांनी दिली.



महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्ती प्रक्रियेदरम्यान संबंधित नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षला उघडपणे मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग झाल्याने ही कारवाई करण्यात आली.



निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये फरुक सादिक तुंडीवाले,इम्रान खान आमानुल्ला खान,फरहाना अ.रऊफ अंसारी,सुनिल अशोक बोरडे,मयुरी दिनेश देने,रुबिना मजिद पठाण आणि अनिल अशोक तिरुखे यांचा समावेश आहे.