Ticker

6/recent/ticker-posts

सिईओ कुलदीप जंगम यांचा मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते सेवाकर्मी पुरस्कार देऊन सन्मान..!


सोलापूर : राज्यातील १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम आणि सेवाकर्मी उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करत सोलापूर जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.


मुंबई येथील Sahyadri Guest House, मलबार हिल येथे झालेल्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री Ashish Shelar, तसेच राज्याचे मुख्य सचिव Rajesh Agrawal प्रमुख उपस्थित होते.





सोलापूर जिल्हा परिषदेच्या या यशामुळे जिल्ह्याची प्रशासनिक ओळख अधिक बळकट झाली असून,मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सकारात्मक विचारसरणी व कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषदेचा सन्मान झाला आहे. याबद्दल पालकमंत्री Jaykumar Gore, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, तसेच विविध समित्यांचे सभापती आणि अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.



गेल्या दीड वर्षांत आषाढी यात्रा - निर्मल वारी उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. गतीमान प्रशासनासोबत डिजिटल सुधारणा, कामांचा वेगवान निपटारा, पूरस्थितीत केलेली उपाययोजना आणि आषाढी यात्रेदरम्यान केलेल्या कामांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

प्रशासनातील पारदर्शकता,प्रभावी सेवा वितरण आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेची ही उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित झाली आहे.